गंगापूर, (प्रतिनिधी) : लायन्स क्लब वाळूज आणि लायन्स आय हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल कंप्यूटर अकॅडमी येथे आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात एकूण ६५ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी धनंजय जेवळीकर आणि निलेश झाल्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. नेत्र तपासणीदरम्यान १८ नागरिकांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले. या सर्व रुग्णांवर लायन्स आय हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख लायन्स योगेश धोत्रे यांनी केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विष्णू जगताप, कल्याणी वंजारे आणि कृपाल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी लायन्स क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली













